विविध बँकांचा राहणार समावेश – याचा सर्वसामान्यावर परिणाम होण्याचे संकेत
नवी दिल्ली
एक जुलै (आजपासून)देशभरातील बँकिंग व करासंदर्भातील नियमावलीत बदल होणार असल्याची माहिती आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या पॉकेट आणि अन्य जनजीवनांवर होणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आयडीबीआय आणि स्टेट बँक यांच्या पैसे काढणे होणार महाग तसचे अन्य या प्रकारचे नियम बदल होणार आहेत.
स्टेट बँक ः जुलै महिन्यांपासून एटीएममधून पैसे काढणे आणि चेकबुक यांचा वापर करणे स्टेट बँकेच्या ग्राहकांना महाग होणार आहे. कारण या सेवांसाठी अधिकचे शुल्क लागू करण्यात येणार आहे. बेसिक सेव्हिंग अकाउंट डिपॉजिट(बीएसबीडी) या खात्यावर हे सर्व नियम लागू असणार आहेत. स्टेट बँकेच्या एटीएमधून बँकेच्या शाखेतून चार वेळा पैसे काढणे विनाशुल्क राहणार आहे.
आयडीबीआय बँक ः आयडीबीआय बँकेने 1 जुलै पासून चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट शुल्क आणि लॉकर शुल्कामध्ये बदल होणार आहे. अधिकची रक्कम जमा करण्यासाठी मोफत बँकेने (होम आणि नॉन होम) सुविधेला सेमी अर्बन आणि रुरल शाखांमध्ये सध्या 7 आणि 10 वेळ हा कालावधी कमी करुन 5-5 इतका वेळ दिला आहे.
सिंडिकेट बँकेसाठी नवा आयएफएससी
सिंडिकेट बँक, कॅनरा बँकेमध्ये विलीन झाली आहे. यामुळे आता 1 जुलैपासून बँकेचा आयएफएससी कोड बदलला जाणार आहे. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांसाठी आपल्या ग्राहकांना आता बँक शाखसाठी नवीन आयएफएससी कोड घ्यावा लागणार आहे.
दागिन्यांच्या प्रत्येक वस्तूची होणार पडताळणी
दागिन्यांची चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तसेच वास्तविक मालकांची ओळख सहजपणे होणार आहे. यामुळे देशातील सर्व नागरिकांच्या आधारकार्डच्या आधारे युआयडीच्या मदतीने केली जाणार आहे. यासाठी सरकार 1 जुलैपासून सोन्याच्या प्रत्येक दागिन्याची पडताळणी होणार आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल शक्य
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्र सरकार एलपीजी सिलेंडरच्या किमतीची घोषणा करत आहे. मागील महिन्यापासून सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 122 रुपयांनी कमी केल्या आहेत.
लहान बचत योजनेतील व्याजदर होणार कमी
लहान स्वरुपातील म्हणजे स्मॉल सेव्हिंग योजनेतील बचतीला झटका बसरणार आहे. कारण सरकारने एप्रिल ते जून तिमाहीत मार्चमध्ये यातील व्याजदरात कपात केली होती. परंतु यानंतर पुन्हा कपातीचा निर्णय मागे घेतला होता. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, किसान पत्र, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, मंथली इनकम, टाइम डिपॉजिट आणि रिकरिंग डिपॉजिट स्कीम या योजना लहान बचत योजनेत येत आहेत.