50 लाख रुपयांहून अधिक किंमत
सायकलचे अनेक प्रकार आता बाजारात उपब्लध आहेत. पण लाकडी सायकल ती देखील 100 वर्षे जुनी असल्यास अत्यंत विशेष ठरते. रंजक बाब ही की पूर्वी ही सायकल चालविण्यासाठी सरकारकडून अनुमती घ्यावी लागत होती आणि त्याचा रितसर परवाना मिळवावा लागत होता.
भारताच्या फाळणीपूर्वी लाकूड आणि लोखंडाच्या मदतीने तयार करण्यात आलेली आणि सुमारे 100 वर्षे जुनी अनोखी सायकल पाहण्यास अद्भूत आहे. पंजाबमध्ये एक अशीच सायकल असून ती पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत असतात.
ही सायकल आमच्या पूर्वजांनी गावानजीक राहणाऱया एका रेल्वे कर्मचाऱयाकडून खरेदी केली होती. सायकल चालविण्यासाठी तेव्हा परवाना मिळवावा लागत होता, जो अजूनही आमच्याकडे आहे. हा परवाना आमच्या काकांच्या नावावर होता अशी माहिती सायकलचे मालक सतविंदर यांनी दिली आहे.
ही अनोखी सायकल पाहून लोक चकित होतात. विशेष बाब म्हणजे ही सायकल अजूनही चालविता येते. या सायकलची खरेदी करण्यासाठी विदेशातून एक व्यक्ती आला होता, जो या सायकलसाठी 50 लाख रुपये देण्यास तयार झाला होता पण आपण ती विकली नसल्याचे सतविंदर यांनी सांगितले आहे.