शुक्रवारी होणार जाहीरनामा प्रसिद्ध; सर्व प्रांताधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश
प्रवीण देसाई कोल्हापूर
कोतवाल म्हणजे महसूल विभागासह गावगाड्यातील महत्वाचा घटक. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदे न भरल्याने तलाठ्यांसह इतर महसूल अधिकाऱ्यांवर त्याच्या कामाचा ताण होता. परंतु आता राज्य सरकारने कोतवालांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतल्याने हा ताण हलका होणार आहे. जिह्यात 107 रिक्त पदे भरण्यासंदर्भात शुक्रवारी (दि.11) जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांना कार्यवाहीबाबत लेखी कळविले आहे. सरकारच्या या निर्णयाचे कोतवाल संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे.
कोतवालांचा जनसामान्यांसोबत विविध कामानिमित्त सतत संपर्क येत असतो. महसूल, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती यासह विविध महत्वपूर्ण कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना सध्या दरमहा 15 हजार रूपये मानधन मिळत आहे. जिह्यात तलाठी सज्जेनिहाय मंजूर पदे 469 इतकी आहेत. त्यातील 334 पदे कार्यरत असून 135 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरावीत, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोतवाल संघटनेकडून शासन स्तरावर पाठपुरावा सुऊ आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोतवालांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिह्यात मंजूर पदापैकी रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के म्हणजे 135 पदांपैकी 107 पदे ही भरली जाणार आहेत. बिंदु नामावलीनुसारच ही प्रक्रिया होणार आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांना भरती प्रक्रियेसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकऱ्याकडून सर्व प्रांताधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर भरतीसंदर्भात गुऊवार (दि.10) पासून 21 सप्टेंबरपर्यंत चा कालबध्द कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. रिक्त पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल कोतवालांमधून समाधानकारक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
जिह्यातील कोतवालांची माहिती
तालुका मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, सध्या भरणारी पदे
करवीर 78 42 36 29
गगनबावडा 9 7 2 1
पन्हाळा 40 31 9 7
शाहूवाडी 39 27 12 10
आजरा 26 22 4 3
भुदरगड 33 24 9 7
राधानगरी 38 32 6 5
कागल 42 35 7 6
शिरोळ 39 26 13 10
हातकणंगले 44 33 11 9
चंदगड 37 24 13 10
गडहिंग्लज 44 31 13 10
——————
एकूण 469 334 135 107
—————–
कोतवालांची रिक्त पदे भरावीत ही अनेक वर्षांची मागणी आहे. यासाठी कोतवाल संघटनेकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुऊ आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने रिक्त पदे भरण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे तलाठ्यांसह इतर महसूल अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण थोडा कमी होईल.
-राजेंद्र पुजारी, माजी पुणे विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना