65 लाख पाण्याचा साठा, आंबेशी-गांजे अंतर फक्त 3 कि.मी., खांडेपार नदीचे पात्र बारामाही जीवंत राहणार
उदय सावंत/वाळपई.
उत्तर गोव्याच्या फोंडा व तिसवाडी तालुक्मयाच्या संपूर्ण भागाला पिण्याच्या पाण्याची पूर्णवेळ सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून गांजे याठिकाणी शंभर कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या जलस्तोत्र खात्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व जलस्रोत खात्याचे मंत्री फिलीप नेरी यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 28 रोजी सकाळी 11.30.वाजता करण्यात येणार आहे .या प्रकल्पाच्या माध्यमातून गांजे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रकल्?पात 65 लाख घनमीटर पाण्याचा साठा होणार असून पैकी 110 एम एल डी पाण्याचा साठा खांडेपार नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. उत्तर गोव्यातील हा महत्त्वाचा व मोठा प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून होंडा व तिसवाडी तालुक्मयाला पूर्णवेळ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
याबाबतची माहिती अशी की जवळपास दोन वर्षापुर्वी सदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांच्या पुढाकाराने सदर प्रकल्प उभारण्यात आला होता.
या प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती देताना जलस्रोत खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले की 111 कटी खर्चून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे .फोंडा व तिसवाडी तालुक्मयाला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणारा व पाणी प्रकल्पाला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या पाण्याचा साठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून गांजे या ठिकाणी खास प्रकल्पाची उभारणी करून या नदीच्या पाण्याचा साठा खांडेपार नदीमध्ये सोडण्याची योजना अमलात आली व यासदर्भाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. यासाठी म्हादई नदीवर या ठिकाणी हा खास प्रकल्प उभारण्यात आलेला आहे .यापूर्वी 35 एमएलडी पाण्याचा साठा खांडेपार नदीमध्ये सोडण्यात येत होता .आता 110 एमएलडी पाण्याचा साठा खांडेपार नदीमध्ये सोडण्यात येणार आहे.यामुळे फोंडा व तिसवाडी तालुक्मयाला पिण्याची पाण्याची सुविधा पूर्णवेळ उपलब्ध होणार असल्याचे प्रमोद बदामी यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2017- 18 वषीच्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात तरतूद केली होती व त्यानंतर या प्रकल्पाच्या उभारणीला चालना मिळाल्याचे प्रमोद बदामी यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रकल्पाची लांबी 108 मीटर.
दरम्यान या संदर्भात देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार या प्रकल्पाची लांबी 108 मीटर आहे. तर या प्रकल्पासाठी एकूण दहा दरवाजांची व्यवस्था करण्यात आलेली आहे .या दरवाजाच्या माध्यमातून पावसाळी मोसमामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे .तर हिवाळी मोसमात सदर दरवाजे बंद करून 65 लाख घनमीटर पाण्याचा साठा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.सदर दरवाजे मेकानिकल असून यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
11 कि.मी जलवाहिनीतून पाण्याचा साठा खांडेपार नदीत सोडणार.
याबाबत अधिक माहिती देताना प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले की 110 एमएलडी पाण्याची क्षमता खांडेपार नदीमध्ये सोडण्यासाठी 11 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे .यासाठी 1000 व्यासाची पाईपलाईन घालण्यात आली असून यामुळे खांडेपार नदीचे पात्र सदाबहार जिवंत राहणार आहे. यासाठी 500 न्न्A क्षमतेचे एकूण पाच पंपांची व्यवस्था करण्यात आलेली आहे . पैकी तीन पंप कार्यरत राहणार असून दोन पंप अतिरिक्त राहणार आहेत.
प्रकल्पाच्यामुळे गांजे-दरम्यानचे अंतर फक्त 3 कि.मी.
या प्रकल्पामुळे आंबेशी दरम्याने अंतर फक्त तीन किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन्ही गावासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पूर्वी हा फक्त धारा प्रकल्प होता. आता आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे या प्रकल्पाच्या नकाशा मध्ये बदल करून प्रकल्प काम फुलाची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गांजे भागातील नागरिकांना आंबेशी या ठिकाणी जाण्यासाठी अवघ्या तीन किलोमीटर अंतर पार करावे लागणार आहे. यामुळे त्यांना ही मोठय़ा प्रमाणात सुविधा निर्माण होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
- पाण्याचा साठा -65 लाख घ.मी.
- प्रकल्पाची लांबी-108 मीट.
- दरवाजे-10 दरवाजे.
- 110 .एम.एल.डी.पाण्याचा साठा खांडेपार नदीत सोडणार.
- खांडेपार नदीचे पात्र बारामाही जीवंत राहणार.