अमेरिकेत सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनची बैठक पार पडली आहे. यात सामील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रतिनिधीने 12-18 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी लवकरच सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. चाचणीदरम्यान सुरक्षिततेकरता मोठी सतर्कता बाळगली जात आहे. किशोरवयीनांवर लस चाचणीनंतर निष्कर्षांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतरच लसीचा डोस अन्य लोकांना दिला जाणार आहे. कंपनीने प्रौढांवर तिसऱया टप्प्यातील चाचणी सप्टेंबरमध्ये सुरू केली होती.
सुमारे 60 हजार लोकांना ही लस देण्यात आली होती. त्या चाचणीची सध्या समीक्षा सुरू आहे. तर फायजर आणि बायोएनटेक या जर्मन कंपनीची चाचणीही अंतिम टप्प्यात आहे.