प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सर्वत्र तपासणी सुरू केली आहे. बुधवारी रात्री पिंपळकट्याजवळ एका तरुणाला ताब्यात घेऊन 13 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुचाकीच्या डिक्कीत 12 लाख 94 हजार रुपये ठेवण्यात आले होते. पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुचाकी अडवून डिकी उघडून पाहिले असता मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली. रात्री उशीरापर्यंत एफआयआर दाखल करण्यात आली.
मार्केटचे पोलीस निरीक्षक पॉल प्रियकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. रोकड जप्त करुन संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. जप्त रक्कम ट्रेजरीला पाठविण्यात येते. दुचाकीवरुन ही रक्कम कोठे नेण्यात येत होती? ते कोणाची आहे, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.