ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशनचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता नसल्याचे भारतीय औषध नियामक मंडळाच्या तज्ज्ञ समितीला आढळून आले. या प्रकारची औषधे आरोग्यास हानी पोहचवू शकतात. त्यामुळे अशा 14 प्रकारच्या औषधांवर बंदी घालण्याची मागणी डीजीसीआयने केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या मागणीवर ठोस पाऊल उचलत औषधांवर बंदी घातली.
फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधे म्हणजे काय?
एकाच गोळीत किंवा सिरपमध्ये दोन किंवा अधिक औषधे एकत्र केली जातात, त्याला फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन म्हणतात. त्याला कॉकटेल असेही म्हटले जाते.