प्रतिनिधी /पणजी
गोवा सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील एकुण 155 जणांना सरकारी नोकऱयांचे नियुक्ती आदेश देण्यात आले.
पर्वरी सचिवालयाच्या परिषदगृहात शुक्रवारी झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने सरकारी सेवेत असताना मृत्यू आलेल्या कर्मचाऱयांच्या मुलांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली तर अन्य लाभार्थ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा समावेश होता.
कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसोबत विशेष सचिव अंकिता आनंद आणि पर्सोनेल खात्याच्या संयुक्त सचिव मेघना शेटगावकर यांचीही उपस्थिती होती.