बेंगळूर : महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही मोठय़ा संख्येने कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या परिस्थितीत सकारात्मक वृत्त पुढे आले आहे. 17 मे नंतर बेंगळूरमधील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय विज्ञान आणि संशोधन केंद्राचे (आयआयएससी) कंम्प्युटेशनल ऍन्ड डाटा सायन्सस विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवडय़ानंतर बेंगळूरमधील नव्या बाधितांच्या संख्येत मोठी घट दिसून येईल, असा अंदाज आहे. लसीकरण अभियान आणि राज्यभरात जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्याचा विश्वास राज्य सरकारला आहे. दरम्यान, कंम्प्युटेशनल ऍन्ड डाटा सायन्सस विभागाने 17 मे नंतर बेंगळुरमधील कोरोनाचा फैलाव कमी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. आयआयएससीने मागील वर्षी देखील अशाच पद्धतीचा अंदाज व्यक्त केला होता. सध्या सुरु असणारे लसीकरण, लॉकडाऊन कालावधीत नोंद होणाऱया आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
Previous Articleपत्रकारांना प्राधान्याने मोफत लस द्या : डॉ. सुधाकर
Next Article बेंगळुरात आज ऑक्सिजन एक्स्प्रेस होणार दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.