इराणमध्ये मोठे संकट .युरोपीय देशांमध्ये रुग्णसंख्या वाढतीच
वॉशिंग्टन : जगात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा बुधवारी दुपारी 2 लाख 03 हजार 842 वर पोहोचला आहे. तर कोरोना संकटाने 170 देश ग्रस्त आहेत. या विषाणूने आतापर्यंत 8 हजार 231 जणांचा जीव घेतला आहे. 81743 रुग्ण पूर्णपणे बरे देखील झाले आहेत. कोरोना संकटामुळे अमेरिकेतील बेरोजगारी दर 20 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीवन नूचिन यांनी नमूद पेले आहे. विषाणूच्या प्रसारामुळे लॉस एंजिलिस शहरात रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे. रक्तदान करणाऱयांच्या संख्येत घट झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. हवाई प्रशासनाने पर्यटकांना न येण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे प्रशासन या संकटावर मात करण्यासाठी लवकरच नौदलाच्या दोन
अत्याधुनिक नौकांचा वापर करणार आहे.
श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे रद्द
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी सकाळी एक आदेश काढला आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता श्रीलंकेत पुढील दोन आठवडय़ांपर्यंत कुठल्याही आंतरराष्ट्रीय उड्डाणाला अनुमती दिली जाणार असल्याचे या आदेशात नमूद आहे. श्रीलंकेत 3 दिवसांची सुटी घोषित करण्यात आली आहे. अवघड प्रसंगी सर्व नागरिक घरातच थांबतील, अशी अपेक्षा आहे. गर्दीयुक्त जागी जाणे टाळून सरकारी नियमांचे पालन करा असे सरकारने म्हटले आहे. श्रीलंकेत बुधवार सकाळपर्यंत एकूण 44 रुग्ण समोर आले आहेत.
वैद्यकीय नौकेचा वापर
अमेरिकेत जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष मार्क मिल लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहेत. देशातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता अमेरिकेच्या नौदलाच्या दोन नौकारुपी रुग्णालये सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरवू शकतात. यातील एक नौका सॅन डियागो तर दुसरी नॉरफ्लॉकमध्ये तैनात आहे. जगातील अन्य कुठल्याच देशाकडे अमेरिकेच्या नौदलासारखे मोबाईला शिप हॉस्पिटल उपलब्ध नाही. यात पंचतारांकित हॉटेल्ससारखी सुविधा तसेच सर्वप्रकारची वैद्यकीय उपकरणे आहेत.
इराणमधील संकट कायम
इराणमध्ये 103 वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. सेमनान शहरातील रुग्णालयात ही महिला उपचार घेत होती. पूर्णपणे बरे वाटल्यावर या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. इराणमध्ये आतापर्यंत हजारो रुग्ण आढळून असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. इराणमध्ये मागील 24 तासांत 129 जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तानात कोरोनाने मंगळवारी पहिला बळी घेतला आहे. संबंधित व्यक्तीचे वय 89 वर्षे होते.
सौदी अरेबियात कामकाज बंद
सौदी अरेबियाने संसर्गाचा वाढता धोका पाहता खासगी क्षेत्र 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पाणी, वीज आणि दूरसंचार सारख्या आवश्यक सेवा वगळता उर्वरित खासगी क्षेत्रात 15 दिवस कामकाज चालणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सौदी प्रशासनाने मशिदींमध्ये होणाऱया नमाजावरही बंदी घातली आहे. सौदी अरेबियात मंगळवारपर्यंत 171 रुग्ण सापडले आहेत.
जपान सरकार घेणार आढावा
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे लवकरच कोरोना विषाणूने उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. टोकिया ऑलिम्पिकच्या आयोजनाचा मुद्दा गंभीर झाला आहे. जपानने कोरोनाच्या संसर्गावर बऱयाचअंशी नियंत्रण मिळविले असू नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच बळींचा आकडा रोखण्यास यश आले आहे.
अमेरिकेतील सतर्कता वाढली
अमेरिकेच्या हवाई बेटाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटनावर निर्भर आहे, पण कोरोना विषाणूने पर्यटन क्षेत्रच अडचणीत आले आहे. हवाईमध्ये सुटीनिमित्त येऊ पाहणाऱया सर्व पर्यटकांनी किमान 1 महिन्यासाठी स्वतःचा दौरा टाळावा, असे आवाहन हवाईचे गव्हर्नर डेव्हिड इगे यांनी केले आहे. हवाईमध्ये अद्याप शेकडो पर्यटक असून प्रशासन सर्वांची आरोग्य तपासणी करत आहे.
..पुतीन प्रशासनाच्या सदस्यांची चाचणी
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या प्रशासनात सामील सदस्यांची कोरोना विषयक चाचणी करण्यात आली आहे. पुतीन यांच्या क्रीमिया दौऱयात सामील पत्रकार कोरोनाने ग्रस्त आढळून आला आहे. विदेश दौऱयावरून आलेल्या पत्रकारांना राष्ट्रपतींच्या कुठल्याच कार्यक्रमात सामील होऊ देणार नसल्याचे पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्कसोव्ह यांनी सांगितले आहे.
अमेरिकेतील सर्व प्रांतांमध्ये रुग्ण
अमेरिकेत 50 प्रांत असून बुधवारपर्यंत कोरोना विषाणूने या सर्व ठिकाणी शिरकाव केला आहे. वेस्ट व्हर्जिनियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मंगळवारी संध्याकाळी आढळून आला आहे. वॉशिंग्टनमध्ये 50 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. न्यूयॉर्कमध्ये 12 तर कॅलिफोर्नियात 11 जणांचा बळी गेला
आहे.
जर्मनीच्या नेत्याला लागण
जर्मनीत चॅन्सेलर पदाचे उमेदवार प्रेडरिक मर्ज यांनाही कोरोनाची लागण
झाली आहे. प्रेडरिक 1989-1914 या कालावधीत युरोपीय संसदेचे सदस्य राहिले
आहेत. ख्रिस्तियन डेमोक्रेटिक पार्टीचे नेते असलेले प्रेडरिक हे अध्यक्षपदाच्या
शर्यतीत सामील आहेत.
इस्रायलचे सैन्य सरसावले
इस्रायलचे सैन्य लवकरच देशात वैद्यकीय सुविधेला हातभार लावणार आहे.
इस्रायलमये काही जणांनी संसर्गाची लक्षणे लपविल्याने स्थिती बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय टाळेबंदी करण्यात येणार असून अंमलबजावणीची जबाबदारी सैन्याकडे असणार आहे.