अनेक मुलींचे स्थळे सांगून येण्यास प्रारंभ
उत्तरप्रदेशच्या शामलीच्या कैरानाचा रहिवासी असणाऱया 2 फूट 6 इंच उंची असलेल्या अजीम मंसूरीचे नशीब आता पालटले आहे. आता त्याला विविध ठिकाणांहून विवाहाचे अनेक प्रस्ताव येत आहेत. एक काळ असा होता, तो स्वतःच्या विवाहासाठी कित्येक घरांचे उंबरठे झिजवत होता. वैतागलेल्या अजीमने विवाह व्हावा याकरता पोलीस स्थानकात जात दादही मागितली हेती. सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल झाल्यावर आता त्याला विवाहासाठी अनेक मुलींची स्थळे सांगून येत असल्याने तो अत्यंत आनंदी राहू लागला आहे.
मला श्रीमंत नको तर गरीब घरातील मुलगी हवी असे अजीमचे म्हणणे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुकृति माधव, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि प्रसारमाध्यमे माझा विवाह व्हावा याकरता कसोशीने प्रयत्न करत आहेत असे उद्गार त्याने काढले आहेत.
अजीमसाठी आता अनेक स्थळे सांगूत येत आहेत. त्याचा विवाह मोठय़ा गाजावाजाने करणार आहोत. अजीमची उंची कमी असल्याने योग्य मुलगी मिळत नव्हती. याचमुळे त्याचा विवाह जुळत नव्हता असे विधान त्याचे काका नौशाद यांनी केले आहे.