युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियात दोन मोठे स्फोट झाले आहेत. रयिशायच बेलगॉरॉड शहरात हे दोन्ही स्फोट झाले असून स्थानिक गव्हर्नरांनी याची पुष्टी दिली आहे. बेलगॉरॉड हे युक्रेनच्या सीमेला लागून असलेले रशियन शहर आहे. खारकीव्हपासून ते केवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे.
युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी रशियाने बेलगॉरॉडमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, परंतु तरीही बेलगॉरॉड शहरामध्ये स्फोट झाले आहेत. या स्फोटांचा युद्धाशी संबंध आहे की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी बेलगॉरॉडमध्ये घुसून नागरी इमारतींवर हल्ला केल्याचा दावा रशियाने केला. तर यापूर्वी रशियाने युक्रेनवर बेलगॉरघ्Ÿडमध्येच रेल्वे ब्रिजवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. परंतु युक्रेनने हा आरोप फेटाळून लावला होता.