नवी दिल्ली
केंद्र सरकार लवकरच आपल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या दोन कंपन्यांचे आयपीओ सादर करणार असल्याची माहिती आहे. इसीजीसी लिमिटेड व भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सी लिमिटेड (आयआरइडीए) यांचे सरकार येत्या काळात म्हणजेच आर्थिक 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत आयपीओ सादर करण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये यांचे आयपीओ आणण्याचे ठरवले होते. पण गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद हवा म्हणून आगामी काळात आयपीओ सादरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.