लांजा येथील घटना, 24 हजार रुपये दंडाची ठोठावली शिक्षा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लांजा तालुक्यातील 14 वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱयाला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास व 24 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी अक्षय शिवाजी गवड (23, पन्हाळा, कोल्हापूर, सध्या लांजा) असे आरोपीचे नाव आह़े त्याच्याविरूद्ध लांजा पोलिसांनी भादंवि कलम 376 व पॉक्सो कायद्यानुसार दोषारोपपत्र ठेवले हेत़े
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाकडून ऍड़ पुष्पराज शेटय़े यांनी काम पाहिल़े खटल्यातील माहितीनुसार, आरोपी अक्षय गवड मूळ कोल्हापूर येथील असून तो लांजा येथे भाडय़ाच्या खोलीत वास्तव्य करत होत़ा 2020 मध्ये अक्षयची लांजा येथील 14 वर्षीय पीडित मुलीशी ओळख झाली व अक्षयने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्य़ात ओढल़े
दरम्यान, अक्षयने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत मे ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल़े पीडित मुलीला पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल़े त्यानुसार पीडितेच्या नातेवाईकांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात शून्य नंबरने तक्रार दाखल केल़ी पोलिसांनी अक्षय गवड याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास लांजा पोलिसांकडे वर्ग केल़ा
लांजा पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी अक्षय याच्याविरूद्ध भादंवि कलम 376 (2)(3) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायदा 2012 (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल केल़ा गुह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े खटल्यादरम्यान एकूण 20 साक्षीदार तपासण्यात आल़े पैरवी अधिकारी म्हणून लांजा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिल़े