वृत्तसंस्था/ पॅरिस
2023 च्या सायकलिंग हंगामात होणाऱया टूर डी फ्रान्स आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला बिलबाओ येथून प्रारंभ होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी शुक्रवारी घोषित केले.
टूर डी फ्रान्स ही सायकलिंग स्पर्धा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रति÷sची समजली जाते. आतापर्यंत झालेल्या दहा स्पर्धांमध्ये सहावेळा या सायकलिंग स्पर्धेचा प्रारंभ फ्रान्सच्या बाहेर करण्यात आला आहे. 2023 च्या टूर डी फ्रान्स स्पर्धेतील पहिले दोन टप्पे बॅक्स्वे देशामध्ये आयोजित केले आहेत. 2015 साली या स्पर्धेला हॉलंडमधील युटेट येथून प्रारंभ करण्यात आला होता. 2021 च्या टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धेला 26 जूनपासून फ्रान्समधील नीस येथून प्रारंभ होणार आहे.