नीरज पांडे यांच्या चित्रपटाची मोठी प्रतीक्षा
बॉलिवूडमध्ये ‘ अ वेंड्नसडे’, स्पेशल 26’ ‘बेबी’ आणि ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ यासारखे उत्तम चित्रपट साकारणारे दिग्दर्शक आणि निर्माते नीरज पांडे यांचा आगामी चित्रपट ‘ऑपरेशन रोमियो’ 22 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सिद्धांत गुप्ता आणि वेदिका पिंटो हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
शशांक शाह यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांची कंपनी फ्राइडे फिल्मवर्क्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात सिद्धांत, वेदिका यांच्यासोबत शरद केळकर, भूमिका चावला आणि किशोर कदम हे कलाकारही दिसून येणार आहेत. नीरज पांडे यांनी यापूर्वी टोटल सियामा, रुस्तम, सात उचक्के, नाम शबानना, टॉयलेट ः एक प्रेम कथा यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. तर त्यांच्या प्रॉडक्शन अंतर्गत विक्रम वेधा या चित्रपट साकारला जात असून यात ऋतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकांमध्ये असणार आहेत.