प्रतिनिधी / बेळगाव :
गोल्फ मैदान परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे बुधवार दि. 10 रोजी बेळगाव शहरासोबत ग्रामीण भागातील 22 शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. शहरातील 13 तर ग्रामीण भागातील 9 शाळांना बुधवारी सुट्टी असेल असे शहर शिक्षणाधिकारी बजंत्री यांनी जाहिर केले आहे.
बेळगाव शहरातील सरकारी प्राथमिक शाळा हनुमान नगर, सरकारी प्राथमिक शाळा कुवेbपू नगर, सराकारी प्राथमिक शाळा सहय़ाद्री नगर, सरकारी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, मराठी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर, केएलई इंटरनॅशनल स्कूल कुवेम्पू नगर, वनिता इंग्लिश मिडियम स्कूल, केंद्रीय विद्यालय-2, मराठी विद्यानिकेतन, एनपीईटी स्कूल क्लब रोड, सेंट झेवियर्स स्कूल, जीएलपीएस उदु& स्कूल टिव्ही सेंटर या 13 शाळांसह हिंडलगा व विजयनगर येथील 13 शाळांना सुटी देण्यात आली आहे.