वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी जेएमसी प्रोजेक्ट्सने शुक्रवारी 2,277 कोटी रुपयांचे नवीन कंत्राट मिळाले असल्याचे सांगितले आहे.
‘अग्रणी स्थापत्य अभियांत्रिकी आणि इपीसी आणि जेएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) लिमिटेडला 2,277 कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत,’ असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. यामध्ये इमारत आणि कारखाना प्रकल्पांच्या ऑर्डरीचा समावेश आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एसके त्रिपाठी म्हणाले, जल क्षेत्रातील नवीन ऑर्डर या व्यवसायातील आमचे नेतृत्व आणि क्षमता मजबूत करण्यास मदत करतील, असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.