बेंगळूर : उत्तर कर्नाटकातील लिंगायत आणि मागासवर्ग समाजाशी संबंधित 25 मठांच्या स्वामीजींनी सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. बेंगळूरमधील सदाशिवनगर येथील निवासस्थानी स्वामीजींनी शिवकुमार यांची भेट घेतली. गदगमधील बाळेहोसूर मठाचे दिंगालेश्वर स्वामीजी, विजापूरचे बसवकुमार स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली 25 मठांचे स्वामीजी डी. के. शिवकुमार यांच्या भेटीसाठी एकत्र आले होते. हडपद गुरुपीठ, रेड्डी गुरुपीठ, बळ्ळारीतील कल्याण मठ, भोवी गुरुपीठ, ईडीग गुरुपीठ, कडकोळ मठ, अक्कलकोट, गडीगौडगाव, उगुरगोळ, बोम्मनहळ्ळी मठ, गोटूर मठ, अगडी मठ, सदाशिवपेठ व इतर मठांचे मठाधीश याप्रसंगी उपस्थित होते. कोरोना संकटकाळात चांगल्या पद्धतीने कामे केल्याबद्दल शिवकुमार यांची स्वामीजींनी प्रशंसा केली.
Previous Articleअधिवेशन केवळ तीनच दिवसांचे
Next Article जगप्रसिद्ध जोग फॉल्स पर्यटकांसाठी मुक्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.