ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरातील 29 देशात कोरोनाचा ‘लॅम्बडा’ व्हेरिएंट आढळून आला आहे. दक्षिण अमेरिकेत या व्हेरिएंटचे मूळ असल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
दक्षिण अमेरिकेतील पेरु राज्यात या व्हेरिएंटने थैमान घातला असून, एप्रिल 2021 पासून 81 टक्के संक्रमित रुग्णांमध्ये लॅम्बडा व्हेरिएंट आढळून आला आहे. तर चिले येथेही मागील 60 दिवसात दाखल झालेल्या 32 टक्के संक्रमित रुग्णांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. याशिवाय अर्जेंटिना, इक्विडोरसह 29 देशात कोरोनाचा हा नवीन प्रकार आढळून आला आहे.
जागतिक आरोग्य संघनेचे म्हणणे आहे की, लॅम्बडा व्हेरिएंटला समजून घेण्यासाठी संशोधन गरजेचे आहे.