जम्मू-काश्मीरमधील भीषण दुर्घटना
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील ताजनिहाल गावात घराला आग लागल्याने तीन बहिणींचा होरपळून अंत झाला आहे. या तिन्ही बहिणी अल्पवयीन होत्या.
तिघीही घराच्या तिसऱ्या मजल्यावर झोपल्या होत्या, घराला आग लागल्याने अब्दुल लतीफ लोम यांची मुलगी बिस्मा (14 वर्षे), सैका (12 वर्षे) आणि सानिया (16 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांच्या कर्मचाऱ्यांनी या तिघींचे मृतदेह हस्तगत केले आहेत. तर आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रामबन जिल्ह्यात मागील सोमवारी देखील आग लागल्याने अनेक दुकाने जळून खाक झाली