दिग्दर्शक रोहित शेट्टीची घोषणा
अक्षय कुमारचा कॉप ड्रामा ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रविवारी स्वतःच्या 48 व्या जन्मदिनी दिग्दर्शक रोहित शेट्टीने हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले आहे. प्रेक्षक आणि माझ्या अभिनेत्यांच्या चाहत्यांनी पूर्ण वर्षभर सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा केली असल्याचे त्याने नमूद केले आहे.
महाराष्ट्रात कोविड-19 मुळे खबरदारीदाखल चित्रपटगृहांना 50 टक्के प्रेक्षकांसह खुले करण्याची अनुमती देण्यात आली आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो. लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. देशभरात 2.5 कोटींहून अधिक आणि महाराष्ट्रात 22 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. याचमुळे आमचा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत प्रेक्षक आणि त्यांचे कुटुंब चित्रपटगृहांमध्ये जाणे सुरक्षित होईल अशी अपेक्षा रोहितने व्यक्त केली आहे.