चिनी वैज्ञानिकांचा दावा : सामूहिक संक्रमणाचा धोका अधिक
वृत्तसंस्था/ बीजिंग
लसीकरणाच्या वाढत्या वेगासह काही लोकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येत नसल्याचे चित्र आहे. चीनच्या बीजिंग विद्यापीठानुसार 10 पैकी 4 कोरोनाबाधितांमध्ये आजाराचे एकही लक्षण नसते. अशा संसर्गात तापमान मापक यंत्रांना चकवा बसतो. अशाप्रकारचे रुग्ण संक्रमणाची जाणीव न झल्याने स्वतःची चाचणी करवत नाहीत, यातून विषाणू फैलावण्यापासून रोखण्यास अधिकच समस्या होते.
सर्वसाधारणपणे कोरोनाबाधितांमध्ये कोरडा खोकला, ताप आणि निमोनियाचा त्रास जाणवतो. पण काही लोक लक्षणाशिवायच या विषाणूने ग्रस्त असतात. याकरता चार घटक कारणीभूत असतात. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती बळकट असणे, अधिक लसीकरण, कोरोनाविषयक नियमांचे पालन, विषाणूचे सातत्याने होणारे उत्परिवर्तन या घटकांमुळे हे घडत असते.
संशोधनाकरता मोठा डाटा
चिनी वैज्ञानिकांनी स्वतःच्या संशोधनात 95 अध्ययनांचा आढावा घेतला आहे. या आढाव्यात सुमारे 3 कोटी लोकांचा डाटा सामील होता. यातील 35 अध्ययनं युरोपमध्ये, 32 उत्तर अमेरिकेत आणि 25 आशियात झाली आहेत. संशोधनात लक्षणरहित कोरोनाबाधितांची ओळख पटविण्यात आली.
संशोधनाचे निष्कर्ष..
संशोधनात सामील लोकांपैकी 11,516 किंवा 0.25 टक्के लोक विषाणूने संक्रमित.
कोरोनाबाधित रुग्णांपैकी 40.5 टक्के जणांना आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते.
संक्रमित लोकांमध्ये सर्वाधिक 54.11 गरोदर महिला होत्या.
त्यानंतर विमान, क्रूजमधील प्रवासी अन् आरोग्य कर्मचाऱयांना लागण
सर्वात कमी किंवा सौम्य लक्षणे 60 वर्षांपेक्षा वयाच्या लोकांमध्ये होती
संक्रमणाचा दर 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये अधिक होता.
लक्षणरहित रुग्ण सर्वाधिक विकसित देशांमध्ये आढळून आले
अमेरिकेत सर्वाधिक युरोपमध्ये दुसऱया तर आशिया याप्रकरणी तिसऱयास्थानी
वैज्ञानिकांचे मत
सामूहिक संसर्गापासून वाचण्यासाठी सर्वसामान्य लोकांची अधिकाधिक चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱयांची सातत्याने चाचणी करणे देखील गरजेचे आहे, कारण संक्रमणाचा सर्वात मोठा धोका त्यांच्यापासूनच असतो असे संशोधकांनी म्हटले आहे. याचबरोबर कोरोना संक्रमणात डेकेदुखी, सर्दी, खोकला आणि ताप यासारखी लक्षणे आता सामान्य ठरली आहेत. तरीही त्यांना गांभीर्याने घेतले जावे. लसीकरण अन् नियमांचे पालन करणे आताही संक्रमणापासून बचावाचे प्रभावी मार्ग असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात आले.