हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागले : आण्विक हल्ल्याची धमकी
युक्रेनमध्ये मागील 24 दिवसांपासून भीषण हल्ले करत असलेल्या रशियाने आता युद्धात स्वतःच्या महाविनाशक हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करणे सुरू केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने किंझल हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करून युक्रेनच्या क्षेपणास्त्रसाठय़ाला नष्ट केल्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या युद्धात रशियाचा आणखी एक जनरल एंद्रेई मोरदविचेव यांचा मृत्यू झाल्यावर रशियाने या घातक क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.
युद्धादरम्यान मारले गेलेले जनरल एंद्रेई हे रशियाचे 5 वे वरिष्ठ सैन्याधिकारी आहेत. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे आण्विक धमकीचा वापर करत असून एका नव्या अणुबॉम्बवर काम करत आहे. याद्वारे पाश्चिमात्य देशांचे रक्षा कवच देखील भेदले जाऊ शकते. युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याला सातत्याने फटका बसत राहिल्यास पुतीन हे आण्विक हल्ल्याची तयारी करू शकतात, असा इशारा अमेरिकेच्या एका अधिकाऱयाने दिला आहे.
कीव्हवरील वाढला धोका
युक्रेनची राजधानी कीव्हवर आण्विक हल्ल्याचा धोका वाढू शकतो. कीव्हमध्ये रशियाचे सैन्य सातत्याने हल्ले करत असले तरीही अद्याप त्याला यश मिळू शकलेले नाही. हताश पुतीन हे पूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकतात असे उद्गार अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजेन्सी एजेन्सीचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियर यांनी काढले आहेत. युद्ध आणि त्याच्या परिणामांमुळे रशियाची पारंपरिक सैन्य क्षमता कमकुवत होत असल्याने तो स्वतःच्या आण्विक अस्त्रांवर विसंबून राहू शकतो. याच्या माध्यमातून रशिया पाश्चिमात्य देश आणि स्वतःच्या जनतेला संदेश देऊ शकतो, असेही बेरियर यांनी म्हटले आहे.
कॅलिबर क्रूझ क्षेपणस्त्रांचे उत्पादन
जवळपास सर्व क्षेपणास्त्रs, दारूगोळय़ाचा वापर झाल्याने सैन्य-राजकीय नेतृत्वाने रशियाच्या शस्त्रास्त्र उद्योगात काम करणाऱया सर्व कंपन्यांना स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कॅलिबर क्रूज क्षेपणास्त्रs आणि दारूगोळय़ाचे उत्पादन ‘टॉरनेडो’ मल्टीपल लाँच रॉकेट सिस्टीमसाठी केले आहे.