1 लाख 76 हजार प्रवाशांचा विमान प्रवास : राज्यातील व्यस्त विमानतळांमध्ये बेळगावचा तिसरा क्रमांक
प्रतिनिधी /बेळगाव
जानेवारी ते जून या अर्धवर्षामध्ये मागील वषीच्या तुलनेत प्रवासी संख्येत 5 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. जून अखेरपर्यंत 1 लाख 76 हजार 515 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात व्यस्त विमानतळांमध्ये बेळगावचा तिसरा क्रमांक अबाधित राहिला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तिन्हीही राज्यांच्या सीमेवर वसलेल्या बेळगाव विमानतळावरून देशाच्या प्रमुख शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रवासी विमान प्रवास करीत आहेत. बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर बेळगाव विमानतळाचा प्रवासी संख्येत क्रमांक लागतो. अवघ्या 100 किलो मीटरवर गोवा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच हुबळी व कोल्हापूर हे विमानतळ असतानाही बेळगावमधून प्रवाशांची होणारी वाहतूक ही कौतुकास्पद बाब आहे.
जानेवारी 2022 ते जून 2022 या अर्धवर्षामध्ये 3 हजार 86 विमानांची ये-जा झाली असून त्यामधून 1 लाख 76 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याचबरोबर 113 टन कार्गोची वाहतूक झाली आहे. 2021 मध्ये पहिल्या सहा महिन्यांत 1 लाख 68 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामुळे मागीलवर्षाच्या तुलनेत यावषी प्रवासी संख्येत 5 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. बेळगावमधून दिल्ली, बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, इंदूर, नागपूर, पुणे, नाशिक, तिरुपती या शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे.
जून महिन्यात प्रवासी संख्येत घट
मागील सहा महिन्यांचा विचार करता प्रत्येक महिन्यात विमान प्रवासीसंख्या झपाटय़ाने वाढत असताना जून महिन्यात मात्र ती कमी झाल्याचे दिसत आहे. मे महिन्यात 37 हजार 301 असणारी प्रवासी संख्या जून महिन्यामध्ये 32 हजार 940 वर पोहोचली होती. एकाच महिन्यात 5 हजारांनी प्रवासी संख्या कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच विमानफेऱयांनाही प्रतिसाद कमी होत असल्याने यावर वेळीच उपाययोजना न केल्यास काही शहरांना विमानफेरी बंद होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
मागील सहा महिन्यांचा तपशील
महिना | 2022 प्रवासी संख्या | 2021 प्रवासी संख्या |
जानेवारी | 18056 | 39063 |
फेब्रुवारी | 23303 | 37469 |
मार्च | 30404 | 34380 |
एप्रिल | 34512 | 25055 |
मे | 37301 | 12725 |
जून | 32940 | 19320 |