चालक व कर्मचार्यांच्या दुर्लक्ष्यामुळे स्कूल बसमधून पडून एका ५ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रामनगर जिल्ह्यातील कनकपूर तालुक्यातील हारोहळळी येथे घडली आहे. रक्षा असे या निष्पाप मुलीचे नाव असून सिद्देगौडहळळीची ती रहिवाशी आहे. रक्षा यूकेजीत शिकत होती. बसचा दरवाजा न लावल्याने रक्षा एका वळणावर बसमधून खाली पडली आणि तिचं डोकं चाकाखाली सापडलं.
कनकपूर ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.