छायाचित्रे पाहून लोक आश्चर्यचकित
लुंगी आणि शर्टमध्ये मजुरी करणाऱया 60 वर्षीय इसमाने एक दिवस आपण इंटरनेटच्या जगात स्वतःच्या मॉडेलिंगच्या टॅलेंटद्वारे ट्रेंडिंग टॉपिक ठरू ही कल्पनाच कधी केलेली नसेल. या मजुराचे नाव मम्मिक्का असून तो केरळच्या कोझीकोड शहराचा रहिवासी आहे. तसेही मम्मिक्काला ओळखणाले त्याला जुनी लुंगी आणि शर्टमध्येच पाहत आले होते. परंतु एका छायाचित्रकाराने या मजुराला स्वतःच्या प्रोजेक्टसाठी निवडले, मग ममिक्काच सुपर ग्लॅमरस मेकओव्हर इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
ओळखले मॉडेलिंग टॅलेंट
छायाचित्रकार शारिक वायलिल यांनी या मजुरामधील छुपे टॅलेंट ओळखून त्यांना स्वतःच्या एका प्रोजेक्टसाठी मॉडेल म्हणून सादर केले. वायलिल यांनी यापूर्वी मम्मिक्का यांचे एक छायाचित्र शेअर केले होते, जे अभिनेता विनायकन यांच्याशी मिळतेजुळते होते.
मेकओव्हरने दिला नवा लुक
नवे काम मिळाल्यावर शारिक यांना सर्वप्रथम मम्मिक्का यांचेच नाव सुचले. त्यांनी त्वरित 60 वर्षीय मजुराला प्रोजेक्टची माहिती दिली, ज्यानंतर आर्टिस्ट मजनसने त्यांचा मेकओव्हर केलेला पाहून सोशल मीडियावरील लोक मम्मिक्का यांच्या स्वॅगचे कौतुक करत आहेत.
जणू प्रोफेशनल मॉडेल हा फोटोशूट एका स्थानिक कंपनीच्या प्रमोशनासाठी करण्यात आले, ज्यात मम्मिक्का सूट-बूट परिधान करून, डोळय़ांवर गॉगल चढवून आणि हातात आयपॅड धरत पोझ देताना दिसून येत आहेत. त्यांचा लुक एखाद्या प्रोफेशनल मॉडेलपेक्षा कमी वाटत नाही. मम्मिक्का स्वतःच्या या यशामुळे अत्यंत आनंदी आहेत. स्वतःच्या कामासोबत अशा ऑफर्स मिळाल्या तर मॉडेलिंगही सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मम्मिक्का आता कोझीकोडमध्ये हीरो ठरले आहेत