भुवनेश्वर / वृत्तसंस्था
ओडिशात 650 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. हे लोक ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गावातील डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहत होते. शस्त्रे ठेवणारे बहुतेक माओवादी हे मलकानगिरी जिह्यातील स्वाभिमान झोनमधील स्थानिक ग्राम समित्यांचे किंवा चेतना नाटय़ मंडळीचे सदस्य आहेत. हा भाग ओडिशाचा रेड कॉरिडॉर मानला जात होता. चेतना नाटय़ मंडळी ही प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)शी संलग्न असलेली संघटना आहे. मोठय़ा प्रमाणात झालेल्या या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामध्ये मध्यस्थांनी बजावलेली भूमिका मोलाची ठरली आहे.