युटय़ूबद्वारे कमाविते मोठी रक्कम
अनास्तासिया रैडजिस्काया या 7 वर्षीय मुलीची कमाई पाहून मोठमोठे लोक अवाप् होत आहेत. रशियातील ही मुलगी सोशल मीडिया स्टार आहे. तिच्या व्हिडिओजना लाखो नव्हे तर कोटय़वधी वेळा पाहिले जाते, याचमुळे ती दर महिन्याला 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करत आहे. ही 7 वर्षीय मुलगी 140 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तेची मालकीण आहे.
अनास्तासियाला जन्मानंतर न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर असल्याचे निदान झाले होते. यामुळे तिच्या आईवडिलांनी स्वतःची नोकरी सोडत मुलीसाठी लाइक नास्त्या नावाने एक युटय़ूब चॅनेल सुरू केले. अनास्तासियासाठी एक शैक्षणिक प्रकल्प म्हणून त्याची सुरुवात करण्यात आली होती.
बंपर कमाई
अनास्तासिया युटय़ूबच्या पॉप्युलर क्रिएटर्सच्या यादीत सामील झाली आहे. मागील वर्षी तिने सुमारे 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. तिच्या या यशामागे तिच्या पालकांचे योगदान आहे. अनास्तासिया स्वतःच्या लक्झरी फॅमिली हॉलिडेच्या आधारावर कंटेंट तयार करते, ज्याला ती युटय़ूब आणि इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करते. तिचे कंटेंट मुलांवर केंद्रीत पौष्टिक सामग्री आणि आकर्षक हॉलिडे तसेच महागडय़ा खासगी जेट प्रवासांच्या छायाचित्रांचे मिश्रण असते.
टॉप कंटेंट क्रिएटर्स
काही वर्षांमध्येच या युटय़ूब चॅनेलवरून तिला उत्पन्न मिळू लागले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी वेगवेगळय़ा प्रकारे कंटेंट तयार करण्यास सुरू केले, यामुळे अनास्तासिया युटय़ूबवर सर्वाधिक पैसे कमाविणाऱया कंटेंट क्रिएटर्सच्या पहिल्या 10 जणांच्या यादीत 6 व्या स्थानावर पोहोचली आहे.
एका व्हिडिओला 90 कोटी ह्यूज
या मुलीच्या कंटेंटला लोक किती पसंत करतात याचे उदाहरण तिचा 4 वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओला 90 कोटींहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर तिच्या चॅनेलला 86 दशलक्ष लोकांनी सब्सक्राइब केले आहे. या चॅनेलला आतापर्यंत एकूण 6900 कोटी ह्यूज मिळाले आहेत.