वृत्तसंस्था / इटानगर
येथे सुरू असलेल्या पाचव्या कनिष्ठ मुलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत सेनादलाच्या 8 तसेच अरुणाचल प्रदेशच्या चार मुष्टीयोद्ध्यांनी विविध वजन गटातून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. अरुणाचल प्रदेशच्या मुष्ट्योद्ध्यांनी आपले दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवताना 4 रौप्य आणि दोन कास्यपदके निश्चित केली आहेत.
46 किलो गटात तेची जॅकीने, 52 किलो गटात जी रियेने, 54 किलो गटात होडाँगने, 57 किलो गटात तेजिओ लियाकने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 50 किलो गटात लोमारिंग तसेच 60 किलो गटात तारा सोनिया यांनी आपली कास्यपदके निश्चित केली आहेत. मणिपूरच्या एम. एम. पुनशिबा, 66 किलो गटात मिझोरामच्या लेनूनपुईया, 66 किलो गटात विलायत अली, 80 किलो गटात एस. श्रीयाश तसेच 80 किलो वरील गटात हिमाचल प्रदेशच्या वेदांतने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.