एका महिलेला अटक, सीआयडीने केली कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी फातोर्डा येथे केलेल्या कारवाईत रोख रकमेसह 8 लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. तिच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून तिला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या महिलेचे नाव मिनाक्षी खोलकर (वय 34) असे आहे. संशयित महिला ड्रग्ज व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सीआयडी पोलिसांनी त्वरित कारवाई करून तिला अटक केली. तिच्याकडून 866 ग्रॅम हशीष तेल, 1.9 किलो गांजा, तसेच 3 लाख 28 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.