समुद्रकिनारी अन् पर्वतांवर जातात एकत्र
काही लोकांना स्वतःच्या पाळीव प्राण्यांबद्दल अत्यंत प्रेम असते. अशाच काही लोकांपैकी एक आहे. गुडलिन कुटुंब आहे. या कुटुंबात माणसांपेक्षा श्वान अधिक आहेत. या कुटुंबात आईवडिलांसह 4 भावंडं आणि 8 श्वान आहेत. 6 लोकांचे कुटुंब 8 श्वानांना सांभाळत असून ते स्वतःला 14 जणांचे कुटुंब मानतात.
या प्राणीप्रेमी कुटुंबात एकूण 8 श्वान असून 6 जणांच्या कुटुंबाचा ते आता हिस्सा ठरले आहेत. आता हे श्वान गुडलिन कुटुंबासोबत खाण्यापिण्यासह फिरण्यास जात असतात. हे कुटुंब स्वतःचे श्वान आणि जीवनशैलीशी निगडित व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करते आणि लोकांची याला पसंती देखील मिळते. 8 श्वानांपैकी 3 श्वानांचा आकार हा माणसांच्या उंचीपेक्षाही अधिक आहे.
द गुड हाइप नावाच्या मोठय़ा डॉग फॅमिलीत 2 जर्मन शेफर्ड डॉग शकीरा आणि टिफनी आहेत. तर 2 ग्रेट डेंस-मॅलेफिसेंट आणि सिलहोट आहेत. एक गोल्डन रिट्रीवर डॉग जोजो आहे. एक इंग्लिश डॉग ब्रिजेट, एक बर्नीज माउंटेन डॉग बकेई आणि एक ग्रेट पायरेनीज पपी खालेसी देखील या कुटुंबात सामील आहे.
आम्ही आमच्या श्वानांना कधीच प्राण्यांप्रमाणे वागविले नाही. ते आमच्या सोबत बिछान्यावरच झोपतात आणि सोबत खात-पित असतात. अमेरिकेच्या ओरेगनमध्ये राहणाऱया गुडलिन कुटुंबाचे लोक त्यांना सर्वत्र स्वतःसोबत नेत असतात. 8 श्वानांना विदेशी न्यायचे असल्यास गुडलिन कुटुंबासोबत विमानात जातात, हॉर्स शो पहायला जातात आणि मॉलमध्ये शॉपिंग करण्यासही श्वान जात असतात. समुद्रकिनाऱयावर श्वानांना हे कुटुंब स्वतःसोबत डे आउटवर नेत असते. श्वानांचा हिंडण्याचा आणि धावण्याचा स्वतःचा असा वेळ आहे. तर संध्याकाळी त्यांची ट्रेनिंग क्लासेस असतात. प्रत्येक श्वान महिन्याला 18 किलो खाद्य संपवितो.