म्हापसा : म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी म्हापसा बस स्थानकाच्या मागे छापा घालून इंदिरानगर चिंबल तिसवाडी येथील संशयित शामशू सलील करीम खान (26) याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 800 ग्राम गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत 80 हजार ऊपये होते. म्हापसा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक रीचा भोसले यांच्यासमवेत हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई प्रकाश पोळेकर, विनय हिरोजी, अक्षय पाटील, राजेश कांदोळकर, तुकाराम कांबळी, आनंद राठोड यांनी हा छापा घातला. या छाप्यादरम्यान संशयितास ताब्यात घेतले असता वरील अमली पदार्थ त्याच्याजवळ आढळून आला. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक विराज कोरगावकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
Previous Articleगोव्यात प्रथमच ‘सी 20 परिषदे’चे आयोजन !
Next Article बाळ्ळी आंदोलनातील शहिदांना 25 रोजी श्रद्धांजली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.