सोमवारी होती शेवटची मुदत
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेतील स्वच्छता कामगारांची रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. सोमवार दि. 13 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यादिवशी महापालिकेकडे सर्वाधिक अर्ज दाखल झाले. शंभर रिक्त जागांसाठी मागविण्यात आलेल्या अर्ज प्रक्रियेत 841 कामगारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
महापालिकेकडून यापूर्वी 150 जागा भरण्यासाठी अर्ज घेण्यात आले होते. मात्र तीनवेळा छाननी करूनदेखील 150 कामगारांच्या नावांची यादी अद्याप प्रसिद्ध केली नाही. तर आता आणखी 100 जागा भरण्यासाठी नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. त्याकरिता अधिसूचना जारी करण्यात आली होती. अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटची मुदत होती. यापूर्वी 1100 कामगारांनी महापालिकेच्या आरोग्यविभागातून अर्ज घेतले होते. पण कोणीच अर्ज दाखल केले नव्हते. काही मोजक्मयाच स्वच्छता कामगारांनी कागदपत्राची पूर्तता करून अर्ज दिले होते. मात्र सोमवारी शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकाच दिवशी 841 कामगारांनी महापालिकेच्या आवक-जावक विभागात अर्ज दिले आहेत.