शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी किरकोळ वादावादीचे प्रसंग वळता सर्वत्र शांततेने मतदान पार पडले 17 ग्रामपंचायत साठी एकूण (84/52 ) टक्के मतदान झाले अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणेत बंद झाले आहे. शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणुका या अत्यंत प्रतिष्ठेच्या झाल्या आपल्या गटाची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षाचे व गटाचे नेते अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील झाले होते. अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले परंतु औरवाड या ठिकाणी किरकोळ वादावादीची घटना घडली स्थानिक नेते मंडळींनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार घडला नाही दरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, पोलिस उपाधिक्षक रामेश्वर वैंजने यांनी भेट देवून पाहणी केली.
शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायत साठी एकुण 65 हजार 885 मतदारांपैकी 55 हजार 787मतदारांनी आपला मताचा हक्क बजावला ,राजापूरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती 16 सरपंच पदासाठी 47 उमेदवार तर पदाच्या 187 जागेसाठी 451 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत 75 प्रभागा करीता 103 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते या करीता एकूण 6 18 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, नवे दानवाड, अकिवाट, हेरवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, लाटवाडी, अब्दुललाट, औरवाड, कनवाड, चिंचवाड, हरोली, कवठेसार, उमळवाड, संभाजीपूर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सकाळी ७ : ३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ : ३० वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती.