कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयामार्फत कोल्हापूर लोकसभा मतदार संघात शहरी विकास योजनेच्या कामांना 9 कोटी 43 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील कोल्हापूर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल शहराच्या विकास कामासाठी हा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून शहरातील अंतर्गत रस्ते, गटर्स दुरुस्ती, शहरातील उद्याने विकास, हायमास्ट बसविणे, उद्यानामध्ये खेळांचे साहित्य बसविणे इत्यादी कामे केली जाणार आहे. कोल्हापूर शहरासाठी 5 कोटी 50 लाख, गडहिंग्लज शहरासाठी 1 कोटी 50 लाख, आजरा शहरासाठी 1 कोटी 40 लाख, चंदगड शहरासाठी 55 लाख व कागल शहरासाठी 40 लाख मंजूर झाला असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगीतले. सदरचा निधी मंजूर करणेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री दिपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले .