ग्राहकांना पसंत पडण्याचा विश्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बजाज कंपनीची सर्वाधिक प्रसिद्ध आणि विक्रीचा उच्चांक गाठलेली दुचाकी सीटी 100 मॉडेल नुकतेच सादर करण्यात आली आहे. कंपनीने या दुचाकीला ई 2020 किक स्टार्ट मॉडेलसोबत बाजारात आणले असून याची एक्सशोरुम किमत 46,432 रुपये आहे. यासोबतच जुन्या दुचाकीवर रिप्लेस सुविधाही कंपनीने सुरु केली असल्याची माहिती आहे.
जुन्या मॉडेलच्या तुलनेत सदरच्या मॉडेलची किमत ही जवळपास 2000 रुपयांनी अधिक आहे. बजाज सीटी 100 मध्ये आठ नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. या फिचर्समध्ये न्यू टँक ग्राफिक्ससह अन्य सुविधा कंपनीने दिल्या आहेत. सोबत जानेवारीतच बीएस 6 इंजिन प्रणालीसोबत यांची रचना केली होती.