प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱया डोसचे लसीकरण सोमवार, 28 जूनला करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी जिल्हय़ातील विविध केंद्रांवर एकूण 7 हजार 780 कोविशिल्डच्या लसी उपलब्ध असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिली.
दुसऱया डोससाठी पात्र लाभार्थ्यांचे, ज्यांना पहिला डोस घेतल्यावर 84 दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय उपलब्ध आहे. जिल्हय़ातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नायर यांनी केले आहे.
सदर लसीकरण सत्र पुढीलप्रमाणे आहे. तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र व उपलब्ध डोस यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. वैभववाडी तालुक्मयातील – वैभववाडी – 100, सडुरे – 80, लोरे 2 – 80, उंबर्डे- 80, भुईबावडा – 80, कणकवली तालुक्मयातील- नडगिवे – 80, शिडवणे – 80, कासार्डे-80, साटमवाडी- 80, सांगवे- 80, दिगवळे- 80, लोरे 1 – 80, हरकुळ खु.- 80, ओसरगाव- 80, शिवडाव-80, कलमठ- 80, कासरल- 80, हुमरट- 80, तरंदळे- 80, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली- 160, देवगड तालुक्मयातील- पडेल- 80, गिर्ये- 80, मुटाट- 80, नाडण- 80, फणसगाव-80, धालवली- 80, हिंदळे- 80, नारिंग्रे – 80, इळये- 80, जामसंडे- 80, कुवळे- 80, वळिवंडे-80, उपजिल्हा रुग्णालय, देवगड- 160, मालवण तालुक्मयातील- बांदिवडे- 80, तोंडवळी-80, कांदळगाव-80, हडी- 80, आंबेरी-80, कुणकवळे- 80, पेंडूर-80, वराड- 80, हेदूळ-80, शिरवंडे- 80, ग्रामीण रुग्णालय, पेंडूर कट्टा-160, ग्रामीण रुग्णालय, मालवण -160, कुडाळ तालुक्मयातील- कुपवडे-80, घोडगे-80, हुमरमळा-80, आंब्रड-80, वाडीवरवडे-80, पिंगुळी-80, पावशी-80, घावनळे-80, गोठोस-80, आकेरी- 80, तेंडोली-80, पाट-80, ग्रामीण रुग्णालय कुडाळ-160, जिल्हा रुग्णालय -160, वेंगुर्ले तालुक्मयातील – कर्ली-80, केळुस-80, वेतोरे-80, दाभोळी-80, उभादांडा 1- 80, आसोली-80, कनयाळ-80, केरवाडा-80, ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ले- 160, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा-160, सावंतवाडी तालुक्मयातील – न्हावेली-80, आरोंदा-80, कारिवडे-80, शिरशिंगे-80, ओटवणे-80, तळवडे-80, चौकुळ-80, माडखोल-80, मडुरा-80, शेर्ले -80, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी-160, दोडामार्ग तालुक्मयातील- पिकुळे-80, वायंगणतड स्कूल-80, मोरगाव-80, मणेरी-80, कोनशी-80, झोंळबे-80, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग- 160 या प्रमाणे एकूण 7 हजार 780 लसी उपलब्ध आहेत.