ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. सोमवारी देशात 37 हजार 566 नव्या संक्रमितांची नोंद झाली. 56 हजार 994 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 907 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 3 कोटी 03 लाख 16 हजार 897 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 93 लाख 66 हजार 601 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 5 लाख 52 हजार 659 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 97 हजार 637 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.