सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी नगरपालिकेच्या हद्दीतील तीन कोटी रुपयाचे खेळणी व हेल्थ फार्म येथील वीज कामे गेली दोन वर्षे अडकून पडली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. त्यांनी आज सत्ताधारी व विरोधकांच्या दोन्ही नगरसेवकांच्या टीम सह या कामांची पाहणी केली. आमदार केसरकर व माजी नगराध्यक्ष साळगावकर यांची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडेकर, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर सह नगरसेवक उपस्थित होते सावंतवाडी शहरात एमटीडीसी मार्फत मोठ्या प्रमाणात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आलेला निधी घोळ झाल्यात असे आता स्पष्ट झाले आहे.