तोतया व्यक्तीच्या नावावर सात गुंठे जमीन गळ्यात मारली, दोघांवर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील जमिनीचा मालकअसल्याचे भासवत दोघा भामट्यांनी शहरातील प्रसिद्ध कापड व्यवसायिक अब्दुलजब्बार शमशुद्दीन खाटीक (वय 40, रा. गुरुवार पेठ, नालबंद गल्ली, मिरज) यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी खाटीक यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, फैय्याज आप्पासाहेब चिकोडे (रा. डिमार्ट मागे, शंभर फुटी रोड, सांगली) आणि एका तोतया व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर रि.स.नं. 82/1/ब या मिळकतीचा नवीन रि.स.नं.34/1/ब मधील सात गुंठे जमीन विक्री करणार असल्याचे सांगत अब्दुलजब्बार खाटीक यांच्याशी व्यवहार झाला. मात्र, कागदपत्र करताना जागेचा मालक मधुकर शामराव पाटील असल्याचे भासविण्यात आले. फैय्याज चिकोडे आणि एक तोतया व्यक्तीने शामराव मधुकर पाटील असे नाव धारण करून बनाटव कागदपत्रे जोडून विक्री अब्दुलजब्बार खाटीक यांना सात गुंठे जमीन विक्री करण्यात आली. मात्र, त्यानंतर जमिनीचा मालक दुसराच असल्याचे स्पष्ट झाले. जमिनीच्या मूळ मालकाचे खोटे नाव सांगून जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्याचे समजताच अब्दुलजब्बार खाटीक यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.