मे महिन्याच्या तुलनेत किरकोळ घट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने बुधवारी घाऊक महागाईचा डेटा बुधवारी जाहीर केला. त्यानुसार जूनमध्ये घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय) घसरून 12.07 टक्के झाला आहे. मे महिन्यात हा दर 12.94 टक्के या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यात आता घसरण झाली आहे. जूनमध्ये पेट्रोल, डिझेल, कच्चे तेलासह जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय मूलभूत धातू, खाद्यपदार्थ यासारख्या उत्पादनांच्या किंमतीही वाढल्याने त्याचा घाऊक महागाई दरावर थेट परिणाम झालेला दिसतो.
मागील वर्षी याच महिन्यात म्हणजे जून 2020 मध्ये घाऊक महागाई दर 1.81 टक्के होता. इंधन दरात झालेली भरमसाठ वाढ आणि स्वयंपाकाचा गॅस महागल्याचा परिणाम महागाई दरावर झाल्याचा दावा वाणिज्य आणि व्यापार क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
किरकोळ महागाई दर 6 टक्क्मयांहून अधिक
सलग दुसऱया महिन्यात देशात किरकोळ महागाई दर 6 टक्क्मयांच्या वर नोंदला गेला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6.26 टक्क्मयांवर होता. हाच दर मे महिन्यात 6.30 टक्के इतका होता. मे महिन्याच्या तुलनेत केवळ 0.04 टक्क्यांची घट नोंद झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई दर जूनमध्ये 5.15 टक्के नोंदविण्यात आला होता. हा दर मेमध्ये 5.01 टक्के होता.