अमेरिकेच्या डॉक्टरांना मिळाले मोठे यश
अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये डॉक्टरांनी मेंदूशास्त्राच्या क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या बेन स्पीच हिस्स्यात इलेक्ट्रोड ट्रान्सप्लान्ट केले आहे. हा व्यक्ती 18 वर्षांपासून अर्धांगवायूने त्रस्त असून त्याला बोलता येत नव्हते. इलेक्ट्रोड ट्रान्सप्लान्ट केल्यावर हा व्यक्ती स्वतःचे म्हणणे मांडण्यास सक्षम झाला आहे.
तोंडाने नसेना का, पण मेंदूने संगणकाच्या स्क्रीनवर पाठविण्यात आलेलया संकतांद्वारे तो स्वतःचे म्हणणे मांडण्यास यशस्वी ठरला आहे. संगणक स्क्रीनवर हा संकेत शब्दात बदलला आहे. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
सॅन फ्रान्सिस्कोतील 38 वर्षीय पांचो वयाच्या 20 व्या वर्षी एका कार दुर्घटनेनंतर अर्धांगवायूचा शिकार ठरला होता. डॉक्टरांच्या पथकाने पांचोच्या बेन स्पीच हिस्स्यात 128 इलेक्ट्रोडची आयताकृती शीट ट्रांसप्लान्ट केली. या शीटला तोंड, ओठ, जबडा आणि जीभेशी संबंधित स्पीचशी निगडित प्रकियांमधून संकेतांचा शोध लावण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते तसेच त्याला संगणकाशी जोडले गेले. या कामात 81 आठवडय़ांचा कालावधी लागला, त्यानंतर पांचो यांना किमान 50 शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले. या शब्दांमध्ये भूक, संगीत आणि संगणक हे शब्द सामील होते. पांचोने प्रारंभी पूर्ण वाक्यात ‘माझे कुटुंब बाहेर आहे’ असे म्हटले आहे. मेंदूच्या हालचालीं ट्रान्सलेट करणारी यंत्रणा आम्ही तयार केली असल्याचे इंजिनियर डेव्हिड मोसेस यांनी म्हटले आहे. ही यंत्रणा इंजिनियर्स आणि पदवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे