प्रतिनिधी /बेळगाव
रोट्रक्ट क्लब ऑफ वेणुग्रामचा दहावा अधिकारग्रहण कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला वेंकटेश देशपांडे, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सचिन कुलगोड, विशाखा पेडणेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षता कुलकर्णी यांच्या गायनाने तर आदित्य चौगुले यांच्या नृत्याने झाली. मावळते सचिव कृष्णकुमार जोशी यांनी अहवाल सादर केला. विशाखा पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. नूतन अध्यक्ष हर्ष शिंदे यांनी पुढील वर्षभरात राबविल्या जाणाऱया कार्यक्रमांची माहिती दिली. मेघन घेवारी यांची सेपेटरी तर श्रीवास्तव जमिहाळ यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष मेहुल शहा यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.
वेंकटेश देशपांडे यांनी रोट्रक्ट क्लबच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचे सांगितले. वैष्णवी बिर्जे, अनिकेत जाधव, निधी हेडा, मेघन घेवारी, सिद्धार्थ पट्टणशेट्टी, रोहित पुजारी, हिमांशू पोरवाल, श्रुष्टी हलकट्टी, अपर्णा पाटील, विजयालक्ष्मी बन्सी, हर्ष शिंदे यांना 2020-21 मधील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी साहिल गांधी यांच्यासह कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते.