‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा फर्स्ट लुक
नेटफ्लिक्सने स्वतःचा आगामी चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’च्या महत्त्वाच्या कलाकारांच्या फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. याचबरोबर निर्मात्यांनी चित्रपटातील मुख्य कलाकारांची घोषणाही केली आहे. या चित्रपटात राधिका आपटे, हुमा कुरैशी, राजकुमार राव आणि सिकंदर खेर दिसून येतील. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा वासन बाला सांभाळार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘स्पॉटलाइट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
तर राधिकाने या चित्रपटाच्या सेटवरील एक बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केला आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या पटकथेबद्दल मात्र कुठलीच माहिती दिलेली नाही. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हेही जाहीर करण्यात आलेले नाही.
राजकुमार राव यापूर्वी ‘रुही’ या चित्रपटात दिसून आला होता. तर राधिका आपटे हिने ‘रात अकेली है’मधील स्वतःच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून दाद मिळविली होती. तर हुमा कुरैशी ‘महारानी’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.