कोकरूड / वार्ताहर :
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण 91.21 टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणातून आज गुरुवारी दुपारी चार वाजता 14980 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने वारणा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम भागात मागील चार, पाच दिवसात पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग 7475 एवढा कमी करण्यात आला होता,त्यामुळे चरण, शित्तूर, बिळाशी पूल मोकळे झाले होते .मात्र पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणातून 14980 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
त्यामुळे वारणा काठावर पूराचे पाणी वाढुन पुन्हा शित्तूर, चरण, बिळाशी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.