मुंबई / ऑनलाईन टीम
शिवसेना भवन तोडण्याच्या विधानावर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यानिमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये कलगी तुरा रंगला असून शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील घडाजंगी अद्याप संपलेली नाही. वारंवार एकमेकांवर टिकास्त्र सूरुच आहे. मुख्यत: निलेश राणे आणि नितेश राणे विरोधकांवर टीका करत असताना अर्वाच्च भाषेचा अवलंब करणे सुरुच ठेवले आहे.
निलेश राणे यांनी यावेळी टीका करताना एकेरी उल्लेख करत मार – झोड करण्याची भाषा केली आहे. निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना म्हणतात की, ”हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत”असं म्हणत निलेश राणेंनी सदा सरवणकर यांना टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी अशा भाषेत शिवसेना खासदास संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत. यावर संजय राऊत काय भाष्य करतात हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.