आयपीओतून 11 हजार कोटी जमवणार – कंपनीवर 500 कोटींचे कर्ज
नवी दिल्ली
केएफसी, पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफीचा व्यवसाय करणारी देवयानी इंटरनॅशनल आपला आयपीओ भारतीय भांडवली बाजारात दाखल करण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.
सदरच्या आयपीओतून कंपनी 11 हजार कोटी रुपये जमवणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरचा आयपीओ 4 ऑगस्टला बाजारात खुला होणार असून 6 ऑगस्टला बंद होणार आहे. 86 ते 90 रुपये इतकी प्रति समभागाची किंमत ठेवली जाणार आहे. आयपीओअंतर्गत कंपनी 440 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार असल्याचे समजते. जमवलेले हे पैसे कंपनी कर्जफेडीसाठी वापरणार आहे, असे कळते. कंपनीच्या डोक्यावर 500 कोटींचे एकत्रित कर्ज असल्याची माहिती आहे.
166 शहरांमध्ये व्यवसाय
देवयानी इंटरनॅशनलच्या यम बँडअंतर्गत भारतात 166 शहरांमध्ये सध्याला 696 स्टोअर्स सुरू आहेत. यामध्ये केएफसी व पिझ्झा हट यांचा समावेश आहे. दरम्यान देवयानीने गेली तीन आर्थिक वर्षे तोटा सहन केला आहे.