20 फूट अंतरापर्यंत फेकते आगीच्या ज्वाळा
आगीच्या ज्वाळा बाहेर पडणारी कार चित्रपटांमध्ये पाहिली असेल. रशियातील एका मॅकेनिकने स्वतःच्या गुणवत्तेद्वारे ही कल्पना सत्यात उतरविली आहे. रशियन मॅकेनिकने स्वतःच्या कारला एक फ्लेम-थ्रोइंग मशीनमध्ये बदलले आहे. वहान मिकेलियन यांनी स्वतःच्या पसंतीची कार तयार करण्यासाठी व्हीएझेड-2106 झिगुलीवर काम केले. या कारला लाडा 1600 या नावानेही ओळखले जाते. वहान स्वतःच्या या कारला ‘ड्रगन’ म्हणत आहेत.
मॅकेनिकची ही कार सुमारे 20 फूट अंतरापर्यंत आगीच्या ज्वाळा फेकू शकते. मिकेलियन चालू महिन्यात एका सोहळय़ाची योजना आखत असून त्यात ‘ड्रगन’ला आग ओकताना पाहिले जाऊ शकते. पण मिकेलियन यांनी स्वतःच्या या प्रयोगाविषयी अधिक माहिती दिलेली नाही. तर एका सोशल मीडिया युजरने या तंत्रज्ञानाविषयी खुलासा केला आहे.
काही स्टेशन वॅगन आणि एसयूव्हीएसमध्ये मागील खिडकीसाठी एक वेगळा विंडशील्ड वॉशिंग रिजरवायर असतो, स्प्रे नोजलची दिशा बदलावी आणि रिजरवायरमध्ये गॅसोलीन आणि डिझेल मिळून भरावे. रियल फेसिंग नोजलच्या बाजूला असलेल्या स्पार्क प्लकपर्यंत बॅटरीद्वारे 12 व्होल्टची वायर न्यावी असे युजरने सांगितले आहे.
जून महिन्यात मिकेलियन यांनी 8 चाकांची कार तयार केली होती. ही कार पाहताना एखाद्या ‘स्पाइड’प्रमाणे भासत होती. उत्तम कार तयार होईपर्यंत मी मेहनत करत राहिलो. जग आता कारला केवळ एक वाहन म्हणून वापरत नाही असे मिकेलियनने म्हटले आहे.