लंडन ः येथील लॉर्डस् मैदानावर गुरूवारी 12 ऑगस्टपासून सुरू होणाऱया भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱया कसोटीसाठी इंग्लंड संघामध्ये अष्टपैलू मोईन अलीचे पुनरागमन झाले आहे. मंगळवारी येथे सरावावेळी इंग्लंडच्या गोलंदाजांना अष्टपैलू मोईन अलीचे मार्गदर्शन लाभले. या दुसऱया कसोटीसाठी कर्णधार रूट आणि प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांच्यात चर्चा झाल्यानंतर संघात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांच्या गैरहजेरीत इंग्लंड संघामध्ये अष्टपैलू मोईन अलीचे पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. 34 वर्षीय मोईन अली हा उपयुक्त फिरकी गोलंदाज असून तो चांगली फलंदाजी करू शकतो. वनडे क्रिकेटमध्ये मोईन अलीची अलिकडची कामगिरी निश्चितच समाधानकारक झाली आहे. मोईन अलीने गेल्या फेब्रुवारीमध्ये आपला शेवटचा सामना भारताविरूद्ध खेळला होता.
Previous Articleआजचे भविष्य 11-08-2021
Next Article तापमानवाढीचा ‘रेड ऍलर्ट’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.